क क्क
» १ व न
क
४
य
> » च , न र % | 1
0” शहि ४
ह.»
नेली मॅकक्लुंग
महिला अधिकार कार्यकर्ती
नेली मॅकक्लुंगचा जन्म 20 ऑक्टोबर 1873 रोजी ऑन्टारियो
प्रांतातील वॅट्सवर्थ उपनगरात झाला. सहा भावंडांमध्ये ती सर्वात
धाकटी होती. ती सात वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने त्यांचे शेत
विकून टाकले. मग त्यांनी मॅनिटोबा प्रांतातील सॉरीस व्हॅली भागात
आपल्या घरूनच कामाला सुरुवात केली. बालपणापासूनच नेली
स्वतंत्र विचारांची आणि उत्साही मुलगी होती. एकदा शहराच्या
सहलीमध्ये मुलींची धावण्याची शर्यत असेल असे तिला वाटले.
पण तसे काही घडले नाही. धावताना लांब स्कर्ट उडतात आणि
त्याकाळी मुलींना आपल्री पावलं आणि पाय उघडे टाकण्याची
परवानगी नव्हती. “याचं कारण काय? असं मी विचारलं,” नेलीने
आपल्या डायरीत लिहिले, “पण मला गप्प बसवण्यात आलं.”
मग नेली शेतकामात व्यस्त झाली. दहा वर्षांची
होईपर्यंत ती शाळेत गेली नाही. पण त्यामुळे तिचे
शिक्षणाबद्दल असलेले प्रेम कमी झाले नाही. राजकारण
आणि जगाबाबत तिची स्वत:ची मते तयार झाली. लहान
वयातच निष्पक्ष विचार करण्याचे महत्त्व ती उमगली.
1889 साली, शिक्षक बनण्यासाठी ती पाच
महिन्यांच्या शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी विनिपेग
शहरात गेली. नेलीला शिक्षिकेचे प्रमाणपत्र मिळाले आणि
वयाच्या सोळाव्या वर्षीच तिने एका खोलीच्या शाळेत
सर्व आठ इयत्तांना शिकवले. काही वेळा ती मधल्या
सुट्टीत विद्यार्थ्यीसोबत फुटबॉल खेळत असे. सुरुवातीला ,
पालकांना ही गोष्ट रुचत नसे, पण नंतर त्यांनी या
गोष्टीचा स्वीकार केला. पुढल्या वर्षी तिने मॅनिटाऊ
शहरात शिकवले. त्यावेळी ती रेव्हरंड जेम्स मॅकक्लुंग
आणि त्यांची पत्नी अनी यांच्या घरी राहिली. अँनी
मॅकक्लुंग यांचा नेलीवर खूप प्रभाव पडला. त्यांनी नेलीचा
परिचय “महिला स्त्रिश्वन टेम्परन्स युनियन” या संस्थेशी
करून दिला. ही संस्था दारुमुळे कुटुंबात निर्माण होणाऱ्या
समस्यांवर काम करीत होती. लोकांनी दारुपासून दूर
राहायला हवं, या त्यांच्या मताशी नेली सहमत होती.
मॅकक्लुंग यांच्या घरी आणखी एक व्यक्ती होती - नीचा
फार्मासिस्ट मूलगा केस्ती' नेलरीवर त्याचा खोलवर प्रभाव पडला.
पाच वर्षांच्या प्रेमालापानंतर तिने 1896 साली वेस्लीशी लग्न
केले आणि आपले शिक्षणाचे कार्य सोडून दिले.
पण इतर अनेक उपक्रम नेलीची वाट पाहात होते. ती पाच
मुलांची आई बनली. 1908 साली तिने लिहिलेल्या सोळा
पुस्तकांपैकी सोइंग सीड्स इन डॅनी हे पहिले पुस्तक प्रकाशित
झाले. हे पुस्तक बरीच वर्षे कॅनडातील सर्वाधिक खप होणारे
पुस्तक होते. त्यानंतर ती एक प्रतिभावान वक्ता आणि
राजकारणी बनली.
पण प्रामुख्याने महिला अधिकारांच्या कार्यासाठी तिचे स्मरण
केले जाते.
1911 साली नेली मॅकक्लुंग आणि तिचे कुटुंब विनिपेगला
गेले आणि तिथेच स्थायिक झाले. तिथे नेलरीने महिलांना मत
देण्याचा अधिकार मिळावा यासाठी झटून काम केले. तिने आपले
आयुष्य पतीला आणि मुलांना वाहून घेतले होते. तिने महिलांचे
आणि मुलांचे खडतर आयुष्य जवळून पाहिले होते. त्यांच्यातील
बरीच कुटुंबे गरीब होती, ते अपार कष्ट करत आणि दारुच्या
व्यसनाने कफल्लक होत. नेली लिहिते, “मतदानाच्या
अधिकारासाठी चळवळ करण्यामागे इतर महिलांबाबत वाटणारी
सहानुभूती होती. हे जग महिलांना आपल्रं कुटुंब वाटावं अशी
इच्छा त्यामागे होती.”
ह. 01; यम > ण
नेली मॅकक्लुंग आपल्या
पुस्तकाचे वाचन जाहीररित्या
करू लागली. मग ती भाषणेही
देऊ लागली, त्यातून श्रोत्यांचे
मनोरंजन करू लागती. तिने
दारुबंदी आणि महिलांचे
अधिकार हे मुद्दे भाषणांतून
मांडले. 1914 साली तिचे
कुटुंब अल्बर्टा प्रांतात स्थायिक
झाले.
अल्बर्टातील
मॅक्लीओड भागात
होणाऱ्या नेलीच्या
भाषणाची
जाहीरात.
80. 1, ७ ३
10%" 1.11,
1०-४1
गणा र 7. 8. या.
७७1॥॥6€ (182 50618 0 (2 टा€च.-
&€58(. 73119 (0 ॥९वा
षः शल [6
8९61 €85]10811812८80 17 ॥४७.०1200
57८ 135 8012100९1202820 (या.
085 ा8825. हट्टा 316
0०7च[0०"855 810 ४1] ७82 16910 आए
॥९- ७&९$( 10111 00 [162 111०01 015
९5580 ३911701: ६७३2७६7011
शअळप्य 289१६ ७380 ६0 बा्थ्येक क अक्टळ वर्ड
च5-.1.1.11. 11:61. १) !च ६०
४०७'लऊः 82/५]रा,४ »१ 1) 5८2९६- ॥1२ऊ: ०. 97:.57'
तोवर नेली महिला मताधिकार विषयात तज्ज्ञ बनल्री होती. तिला
माहीत होते की महिलांच्या मताने दारुच्या व्यापारावर निश्चित
प्रभाव पडेल. त्यामुळे नेली आणि इतर कार्यकर्ते महिलांना हा
अधिकार मिळावा यासाठी जोमाने कामाला लागले.
1916 साली, आपल्या अविरत प्रयत्नांमळे, अल्बर्टा तसेच
सस्काचेवान आणि मॅनिटोबा प्रांतातील महिलांना मतदानाचा
अधिकार मिळाला. आता त्या निवडणुकीला उमेदवार म्हणून
उभ्या राहू शकत होत्या. 1917 साली ब्रिटीश कोलंबिया
प्रांतातील महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. परिस्थिती
बदलू लागली.
18 जलै 1921 रोजी, नेली मॅकक्लंग अल्बर्टा विधानमंडळात
निवडून आली. तिच्याआधी कॅनडाच्या प्रांतिक सरकारमध्ये
केवळ दोन महिलांनी काम केले होते. महिलांच्या अधिकाराचे
काम नेलीने पुढे सुरू ठेवले.
1928 पर्यंत महिला, क्यूबेक वगळता, कठल्याही प्रांतात
मत देऊ शकत होत्या. पण महिलांना अदयाप “व्यक्ती” म्हणून
मान्यता नसल्याने त्यांना सेनेटमध्ये नियुक्ती दिली जात नव्हती.
“काय महिला व्यक्ती नाहीत?” नेली मॅकक्लुंगला हे अमान्य
होते. तिने आणखी चार महिलांसोबत कॅनडाच्या सर्वोच्च
न्यायालयाला कायद्याची स॒योग्य व्याख्या करण्यास सांगितले.
सर्वोच्च न्यायालयानेही महिलांना व्यक्ती म्हणून मान्यता देण्यास
असमर्थता दाखवली तेव्हा या पाच महिला नाराज झाल्या.
त्यांनी लंडनमधील कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयात अपिल
दाखल केले. 18 ऑक्टोबर 1929 रोजी, ब्रिटीश प्ररिव्ही
काऊन्सिलने आपला निकाल दिला. त्याद्वारे महिलांना व्यक्ती
म्हणून मान्यता देण्यात आली. त्यामुळे केनडाच्या सेनेटमध्ये
सदस्य बनण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला.
९. पार्लबी ___ एमितीमर्पी आही
नेली मॅकक्लुंग आ
__ हिर
4
पो
हेत्रीटा एडवईस
कॅनाडाच्या महिलांसाठी हा एक महत्त्वपूर्ण विजय होता. पण
सगळेच या विजयाने आनंदीत झाले नव्हते. मॅककक््लुंगचा मात्र
स्वत:वर ठाम विश्वास होता. त्या महिलांना म्हणाल्या,
“अजिबात माघार घेऊ नका, अजिबात स्पष्टीकरण देऊ नका,
अजिबात माफी मागू नका - आपले काम करा, लोकांना ओरडू
द्या.”
1 सप्टेंबर 1951 रोजी, ब्रिटीश कोलंबियाच्या व्हिक्टोरिया
शहरात नेली मॅकक्लुंगचे निधन झाले. तिच्या थडग्यावर
लिहित्रे आहे “प्रिय आणि अविस्मरणीय.” हे थडगे समान
अधिकार आणि चांगले जीवन यांसाठी महिलांनी केलेल्या
संघर्षाचे प्रभावी प्रतिक आहे.